MPSC Student Agitation Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC विरोधात लिहाल तर...;आयोगाचा विद्यार्थांना इशारा

उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे असे आयोगाचे म्हणणे आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांविरोधात आयोगाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यशैलीबाबत असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला (MPSC Exam) बसण्यास मज्जाव करण्यात येईल, असा इशारा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आला आहे. आयोगाच्या स्वतःच्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून देखील वंचित ठेवण्यात येईल असेदेखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (MPSC Warning To Student )

आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना हा इशारा देण्यात आला असून, आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत अनेकदा प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून असंस्कृत, असभ्य भाषेचा वापर केला जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यशैलीबाबत असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय असे वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांविरोधात काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव केले जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील आयोगाने असभ्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना कारवाईचा इशारा दिला होता. (MPSC Letter )

दरम्यान, आयोगाच्या या भूमीकेवर परिक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा वाढत्या प्रकोपामुळे मागील दोन वर्षांपासून परिक्षा घेण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थांचे (MPSC Student) नुकसान झाले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात 18 ते 20 लाख विद्यार्थी एमपीएससी परिक्षा देत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षात या परिक्षा घेण्यात आलेल्या नाही त्यामुळे लाखो विद्यार्थांचे भविष्य (Student Future) अडचणीत सापडले आहे. दरम्यान, आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रामुळे विद्यार्थांमध्ये संतापाची लाट असून यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (MPSC Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT