Mahavikas Aghadi  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Politics: पुणे पोटनिवडणुकीचं चित्र स्पष्ट नसतांना जागेवरुन महाविकास आघाडीत जुंपली

पुणे पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. जवळपास एक वर्ष लोकसभा निवडणुकीसाठीचा काळ बाकी आहे. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर होईल की नाही हे स्पष्ट नसले तरी पुण्याचे खासदार होण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.

अनेकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून काँग्रेससह राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा केला जात आहे. त्यात ही जागा कुणाला मिळणार यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकताच सादर करण्यात आला. या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. पोटनिवडणुक जाहीर झाल्यास काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही जागा राष्ट्रवादीला दिली जाणार नाही, पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

एकीकडे पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या उमेदवारीवरून भाजपात खलबतं सुरू झाली आहेत. भाजपकडून गिरीश बापट यांच्या घरातुन सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे अशी तीन नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चा सुरू होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT