Prakash Ambedkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: 'प्रश्न सुटत नसेल तर आमदार, खासदारांना मारा'; प्रकाश आंबेडकरांचं धक्कादायक वक्तव्य

तुमचे प्रश्न सुटत नसेल तर आमदार आणि खासदारांना मारा आंबेडकरांचं धक्कादायक वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना अजब असा सल्ला दिला आहे. ते बोलताना म्हणाले की, मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार आणि खासदारांना मारा. निवडून दिलेले अनुसूचित जाती, जमातीचे आमदार आणि खासदार प्रश्न सोडवण्यता कच खात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे, असं धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीप हवी आहे. त्याबाबत माझं माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

तर राज्यातील 861 विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आझाद मैदानात या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हक्काच्या फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आझाद मैदानात त्यांनी भेट घेतली. शिक्षणातून नवीन पिढी उभी राहत असते. त्यासाठी आंदोलन करावं लागणं दुर्दैवी आहे. इतर संस्थांच्या मागे निवडून दिलेले प्रतिनिधी उभे राहतात, त्यांना हाताखाली घेतल्याशिवाय विषय सुटणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटले. महाविकास आघाडीची एकजूट राहील की नाही याबाबत उद्धव ठाकरेंना विचारा, असं आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे. सर्व पक्ष जेपीसी मागत आहेत आणि राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. अजित पवार यांनी पंतप्रधानांनाही क्लीन चीट दिली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

UP Career Guidance: IAS-IPS अधिकारी आता थेट शाळेत; १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देणार योगी सरकार

India Justice Access Reforms: न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे करा; CJI सूर्यकांत यांचा विधी सेवा यंत्रणेला संदेश, मुख्यमंत्र्यांना आठवल्या अहिल्यादेवी

Sangli Crime : सोनी-पाटगावमध्ये सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून; मिरज तालुका हादरला, सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण

आजचे राशिभविष्य - 09 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT