sakal exclusive SAKAL
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकडे दुर्लक्षच! सर्वोपचार रुग्णालयांमध्ये १८०० औषधे मिळत नाहीत; महागडी औषधे बाहेरून खरेदी करावी लागतात

वेगवेगळ्या आजारांवर दोन हजार २००० प्रकारची औषधे आहेत. पण, बहुतेक रुग्णांना एकसारखीच लागणारी ४०० औषधेच सर्वोपचार रुग्णालयाला मिळतात. उर्वरित अठराशे औषधे महाग असल्याने शासनाकडून शासकीय रुग्णालयाला दिली जात नाहीत.

तात्या लांडगे

सोलापूर : वेगवेगळ्या आजारांवर दोन हजार २००० प्रकारची औषधे आहेत. पण, बहुतेक रुग्णांना एकसारखीच लागणारी ४०० औषधेच सर्वोपचार रुग्णालयाला मिळतात. उर्वरित अठराशे औषधे महाग असल्याने शासनाकडून शासकीय रुग्णालयाला दिली जात नाहीत. अशावेळी मोफत मोफत उपचाराच्या आशेने आलेल्या रुग्णाला पदरमोड करुन बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान एक तरी रुग्ण श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येतोच. ग्रामीण आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने त्याठिकाणी औषध-गोळ्या देण्याएवढेच काम चालते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी खिशात पैसे नसल्याने थेट शासकीय रुग्णालय गाठतो. त्या रुग्णाला सर्व प्रकारची औषधे मोफत मिळावीत, त्याच्या खिशाला झळ बसू नये, यासाठी आमदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

मात्र, त्यासंदर्भात बहुतेक लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच या रुग्णालयामधील सिटी स्कॅन मशिन बंद पडून एक वर्षे होऊन गेले, तरी नवीन मशिन मिळालेली नाही. महागडी औषधे अजूनही रुग्णाला बाहेरुनच विकत घ्यावी लागत आहेत. दरम्यान, रुग्णालयातून प्रत्येक रुग्णाला दजेदार उपचार मिळावेत, यासाठी आपण पाठपुरावा करून ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काही लोकप्रतिनिधींनी दिली. त्यानुसार उपाययोजना होतात का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विशेष बाब म्हणजे या विषयावर बोलायला काही आमदारांना वेळ सुद्धा मिळाला नाही, हे दुर्दैवच.

काही औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात

सर्व रुग्णांना लागू होतील, अशी औषधे शासनाकडून सर्वोपचार रुग्णालयाला मिळतात. पण, काही आजारांवरील उपचारासाठी लागणारी महागडी औषधे बाहेरूनच विकत घ्यावी लागतात.

- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

‘एमआरआय’साठी दोन हजारांचे शुल्क

सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाच्या नातेवाईकांना महागडी औषधे बाहेरूनच विकत आणावी लागतात. ‘एमआरआय’साठी दोन हजार रुपये मोजावे लागतात. तर सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने त्यासाठीही रुग्णाला पदरमोडच करावी लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दुसरीकडे केस पेपरसाठी २० ते ९० रुपये घेतले जातात.

रिक्त पदांची भरती अन्‌ हॉस्पिटलच्या विस्तारासाठी पाठपुरावा

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. दुसरीकडे सर्वेपचार रुग्णालयात मशिन नाही. शस्त्रक्रिया जेथे होते, त्याठिकाणी ही मशिन आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असतात. त्यामुळे रुग्णालयाच विस्तार, सिटी स्कॅन मशिन मिळावी, अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- सुभाष देशमुख, आमदार

जिल्हा रुग्णालय याच वर्षी सुरु होईल

जिल्हा रुग्णालयाचे राहिलेले काम आता दोन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर याच वर्षी त्याचे लोकार्पण होईल. तत्पूर्वी, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सर्व प्रकारच्या औषधांचा साठा, सिटी स्कॅन मशिन यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. जिल्हा नियोजन समितीकडूनही त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पत्र दिले आहे.

- विजयकुमार देशमुख, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT