maharashtra, solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी! आधार अपडेट नसल्याने थांबला ६७,०१४ जणांचा लाभ; पुन्हा लाभ सुरू करण्यासाठी करा ‘ही’ प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींनी योजनेचा लाभ घेताना जो बॅंक खाते क्रमांक दिला, त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे. याशिवाय शासनाच्या ‘डीबीटी’ पोर्टलवर ते अपलोड करणे आवश्यक असून त्यानंतर सर्वांना लाभ मिळेल.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ७० हजारांवर तर श्रावणबाळ योजनेचे ९० हजारांवर लाभार्थी आहेत. पण, त्यातील ३४ हजार लाभार्थींनी मागील १२ महिन्यात हयातीचा दाखलाही दिलेला नाही आणि बॅंक खात्याला आधार अपडेट देखील केलेले नाही. दुसरीकडे शासनाकडून आता लाभार्थींच्या बॅंक खात्यात ‘डीबीटी’द्वारे पैसे जमा केले जात आहेत. पण, अजूनही जिल्ह्यातील ६७ हजारांहून अधिक लाभार्थींनी बॅंक खाते ‘डीबीटी’ पोर्टलवर अपलोड न केल्याने त्यांचाही लाभ थांबला आहे.

श्रावणबाळ योजनेचा लाभ ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना घेता येतो, ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणीच सांभाळत नाही असे लोक या योजनेसाठी पात्र आहेत. सोलापूर शहरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील सर्वाधिक २७ हजारांवर लाभार्थी असून त्या खालोखाल उत्तर सोलापूर तालुक्यात दोन्ही योजनांचे २५ हजारांवर आणि माढा तालुक्यात २३ हजार लाभार्थी आहेत. निराधार योजनेत विधवा, परितक्त्या, आधार नसलेल्या, कुटुंबाचे उत्पन्न अत्यल्प असलेल्या महिला आहेत.

दरम्यान, लाभ वितरणाची पद्धत आता पूर्णत: बदलली असून प्रत्येक लाभार्थीस आता त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आधार अपडेट केलेले बॅंक खाते ‘डीबीटी’ पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर त्यांचा लाभ सुरू राहणार असून पूर्वीच्या लाभाचीही रक्कम मिळणार आहे.

डीबीटी पोर्टलवर बॅंक खाते अपलोड करावे लागेल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींनी योजनेचा लाभ घेताना जो बॅंक खाते क्रमांक दिला, त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे. याशिवाय शासनाच्या ‘डीबीटी’ पोर्टलवर ते अपलोड करणे आवश्यक असून त्यानंतर सर्वांना लाभ मिळेल.

- शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर

लाडक्या बहिणींना ‘एनओसी’चे बंधन

सोलापूर जिल्ह्यात अद्याप दरमहा ३०० ते ३५० महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात. त्या अर्जांवर तालुका स्तरावर तहसीलदारांची समिती निर्णय घेते. पण, नव्याने अर्ज करणाऱ्या लाभार्थींना आम्ही शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेचा विशेषत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे लेखी देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार समितीकडून अर्जदार महिला खरोखर दुसऱ्या शासकीय योजनेची लाभार्थी नसल्याची खात्री केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी

  • ‘निराधार, श्रावणबाळ’चे लाभार्थी

  • १.७३ लाख

  • आधार अपडेट केलेले

  • १.३९ लाख

  • लाभ बंद असलेले

  • ३४,०००

  • दरमहा मिळणारा लाभ

  • १५०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT