अनोळखी काॅल्स दूर ठेवा Esakal
महाराष्ट्र बातम्या

मोबाईलधारकांसाठी महत्त्वाची बातमी! अनोळखी क्रमांकाचे कॉल आता करता येतील कायमचे ब्लॉक; ‘या’ आहेत सोप्या टिप्स्‌; सिमकार्ड कंपनीच्या ॲपद्वारेही ‘DND’ सेवा

मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल हे अनेकदा त्रासाचे कारण ठरते. एखाद्या महत्त्वाच्या कामात असताना किंवा विश्रांती घेत असताना असे कॉल सतत येतात आणि त्याचा त्रास होतो. त्यातील काही कॉल तर फसवणुकीचेसुद्धा असू शकतात. पण, या स्पॅम कॉलपासून वाचण्यासाठी काय करायचे? तुमच्या ॲन्ड्राईड फोनवरूनही हे कॉल ब्लॉक करता येतात.

तात्या लांडगे

सोलापूर : मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल हे अनेकदा त्रासाचे कारण ठरते. एखाद्या महत्त्वाच्या कामात असताना किंवा विश्रांती घेत असताना असे कॉल सतत येतात आणि त्याचा त्रास होतो. त्यातील काही कॉल तर फसवणुकीचेसुद्धा असू शकतात. पण, या स्पॅम कॉलपासून वाचण्यासाठी काय करायचे? तुमच्या ॲन्ड्राईड फोनवरूनही हे कॉल ब्लॉक करता येतात.

आता जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हाती ॲन्ड्राईड मोबाइल आला असून अनेकजण अनावश्यक ॲप डाऊनलोड करतात आणि त्यातून आपला खासगी डेटा समोरील अनोळखींना शेअर करतात. अशावेळी आपण त्यासंदर्भातील खबरदारी घ्यायला हवी. आपला नंबर त्या स्पॅम कॉल करणाऱ्या व्यक्तीकडे जातोच कसा, याचा विचार प्रत्येकांनी करायला हवा, असे सायबर पोलिस सांगतात. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरील कॉल किंवा मेसेजला उत्तर देण्यापूर्वी आपली खासगी माहिती देऊ नका, कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, घाईत कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा फसवणूक अटळ असल्याचेही सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

‘या’ काही सोप्या पद्धती...

  • ‘डीएनडी’ सेवा सक्रिय करा, मोबाईलमध्ये असलेल्या एसएमएस ॲपमध्ये जावून ‘स्टार्ट’ टाईप करून १९०९ या नंबरवर पाठवा.

  • तुम्हाला बँकिंग, हॉस्पिटॅलिटी अशा विविध श्रेणींची लिस्ट मिळेल. प्रत्येक श्रेणीला वेगळा कोड असतो.

  • तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉल ब्लॉक करायचे आहेत, त्या श्रेणीचा कोड पाठवा.

  • प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल आणि २४ तासांच्या आत ‘डीएनडी’ सेवा सुरु होईल.

  • ही सेवा थर्ड पार्टीच्या अनधिकृत व्यावसायिक कॉल ब्लॉक करण्यात प्रभावी आहे, पण बँका किंवा इतर महत्वाच्या सेवांच्या माहितीच्या मेसेजवर याचा परिणाम होणार नाही. तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या माध्यमातून डीएनडी सेवा सक्रिय करावी लागेल.

सिम कार्ड कंपनीच्या ॲपद्वारेही ‘डीएनडी’ सेवा

ज्या नंबरवरून आपल्याला स्पॅम कॉल येतात ते नंबर ब्लॉक करता येतात. त्यासाठी फोन ॲपमध्ये जावून कॉल हिस्टरीमध्ये जा आणि स्पॅम नंबरवर काही सेकंद थांबा आणि ब्लॉक किंवा रिपोर्ट यापैकी एक पर्याय निवडा. ही पद्धत उपयुक्त आहे, पण स्पॅम कॉलर्स वेगवेगळे नंबर वापरत असल्याने त्याला मर्यादा आहेत. अज्ञात किंवा संशयास्पद कॉल फिल्टर करावा लागेल. ॲन्ड्राईडमध्ये असा पर्याय आहे, ज्याद्वारे अज्ञात किंवा संशयास्पद स्पॅम कॉल स्वयंचलितपणे फिल्टर करता येतात. त्यासाठी फोन ॲपमध्ये जा आणि सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. कॉलर आयडी आणि स्पॅम निवडा व फिल्टर स्पॅम कॉल्स, ‘सी कॉलर’ आणि स्पॅम आयडी हे पर्याय चालू करा. हे फीचर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करण्यास मदत करते. या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही स्पॅम कॉलचा त्रास कमी करू शकता आणि वेळ वाचवू शकता, असेही आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT