solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

११ महिन्यात १३८८ विवाहितांची कौटुंबिक छळातून पोलिसांत धाव! सोलापूर शहरात ६३७ जोडप्यांचा तुटणारा संसार पोलिसांनी जोडला; पोलिसांकडून ‘नांदा सौख्य भरे’ उपक्रम

सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळात एक हजार ३८८ महिलांनी कौटुंबिक छळावरुन पोलिसांत धाव घेतली. त्यातील ६३७ जणांचे समुपदेशन करुन पोलिसांनी त्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार पुन्हा जोडला. सोमवारी (ता. २२) पोलिस आयुक्तालयातर्फे ‘नांदा सौख्य भरे’ उपक्रम घेतला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळात एक हजार ३८८ महिलांनी कौटुंबिक छळावरुन पोलिसांत धाव घेतली. त्यातील ६३७ जणांचे समुपदेशन करुन पोलिसांनी त्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार पुन्हा जोडला. सोमवारी (ता. २२) पोलिस आयुक्तालयातर्फे ‘नांदा सौख्य भरे’ उपक्रम घेतला. त्याअंतर्गत ३० जोडप्यांचा रोपटे देऊन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सत्कार केला.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील ‘भरोसा सेल’मध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य लोक कौटुंबिक छळाच्या तक्रारी घेऊन येतात. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय शिंगाडे यांच्या नेतृत्वात दोन अधिकारी व १८ पोलिस अंमलदार तक्रारदार व ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्यांचे समुपदेशन करतात. त्यातून ११ महिन्यात सहाशेहून अधिक कुटुंबांतील वाद मिटविण्यात पोलिसांना यश मिळाले. समुपदेशनानंतरही ज्यांचा वाद मिटत नाही, त्याबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल होतो. दरम्यान, समझोता झाल्यावर गैरसमज, वाद बाजूला सारुन पुन्हा नव्याने सुखाचा संसार करणाऱ्या ३० जोडप्यांना पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, पोलिस निरीक्षक धनंजय शिंगाडे, स्नेहा म्हेतर, सहायक पोलिस निरीक्षक स्वाती येळे, उपनिरीक्षक महेश महामुनी, अंजली राठोड, लता राऊत, ताजुद्दिन शेख, निलम माळवे, सैफन पटेल, सुजाता यादवाड, कपिल पिरजादे, कविता डांगे, अंबिका सुरवसे, इंदिरा राठोड, शितल माने, सरस्वती घाडगे, नसिमा शेख यांची उपस्थिती होती.

कौटुंबिक छळाच्या तक्रारीची स्थिती

  • ११ महिन्यांतील तक्रारी

  • १,३८८

  • पोलिसांकडून समझोता

  • ६३७

  • समुपदेशनासाठी अंमलदार

  • २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT