rajesh tope Sakal media
महाराष्ट्र बातम्या

Omicron: जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब वाढवणार-राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रातील सरकार अलर्टवर आहे. यासंदर्भातच राज्य सरकार आणि टास्क फोर्समध्ये आज बैठक झाली आहे. याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय की, राज्यातील वाढती ओमिक्रोनची रूग्णसंख्या लक्षा घेता लहान मुलांच्या लसीकरण सुरू करण्यासंदर्भात आणि बूस्टर डोसबाबत केंद्राकडे आग्रह धरणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नागपूर आणि औरंगाबाद येथे नव्याने लॅबची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की, ओमिक्रॉनची वाढती संख्या पाहता राज्य सरकार आता केंद्राकडे बूस्टर डोसचा आग्रह करणार आहे. सध्या राज्यात तीन जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब आहेत त्यामुळे या लॅब वेळीच वाढवण्याचा विचार आहे, जेणेकरुन भविष्यात गडबड आणि तुटवडा निर्माण होऊ नये. या लॅब नागपूर, औरंगाबादमध्ये होणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोससाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं सांगत असतानाच त्यांनी राजकीय सभा, बैठकांमध्ये वाढती संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलंय. त्यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचंही ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT