महाराष्ट्र बातम्या

Independence Day: जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तीन शिक्षकांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

Indian Flag: शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख या बाहेरगावी गेल्याने शाळेतील राष्ट्रध्वज दिवसभर बेवारस स्थितीत होता. संध्याकाळचे ६:४० वाजले तरी राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला नाही. शिवाय त्याठिकाणी शाळेच्या महिला शिक्षिका हजर नसल्याची माहिती काही व्यक्तींना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

बार्शिटाकळीः शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे ७८ व्या स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी पार पडला. शाळेतील तिन्ही शिक्षिकांपैकी एकही महिला शिक्षिका राष्ट्रध्वजाच्या देखरेखीसाठी शाळेत न थांबता सर्व नियम धाब्यावर बसवून शाळेच्या वर्गखोल्यांना कुलूप लावून अकोला येथे निघून गेल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख या बाहेरगावी गेल्याने शाळेतील राष्ट्रध्वज दिवसभर बेवारस स्थितीत होता. संध्याकाळचे ६:४० वाजले तरी राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला नाही. शिवाय त्याठिकाणी शाळेच्या महिला शिक्षिका हजर नसल्याची माहिती काही व्यक्तींना मिळाली. हा प्रकार तहसिलदार राजेश वझीरे, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे व शिक्षण विस्तार अधिकारी संदिप मालवे यांना दिली. त्यांनी एका शिक्षिकेला फोन लावला. रात्री ७:३० वाजता धोत्रे व काळणे नामक दोन महिला शिक्षिका हजर झाल्या. त्यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज उतरवण्यात आला.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत बार्शिटाकळी पोलीसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत लेखी जबाब नोंदवण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या विरूध्द नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे तिन्ही शिक्षिकांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्याविरूध्द राष्ट्रध्वज अवमान झाल्याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे अशी माहिती संदीप मालवे, शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.बार्शिटाकळी यांनी दिली.

पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सांगितलं की, राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी भांदवि कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''महादेव मुंडेंच्या न्यायासाठी जिल्हा बंद करणार'' मनोज जरांगेंचा इशारा, ज्ञानेश्वरी मुंडेंची घेतली भेट

'उबाठाचे 70 ते 75 टक्के खासदार-आमदार लवकरच पक्ष सोडणार'; संजय निरुपम यांचा मोठा दावा, राज ठाकरेंनाही केलं लक्ष

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्र्यांना गुंड पाहिजेत की सामान्य लोक?- मनोज जरांगे

Manchar News : रस्ता चुकलेल्या व घाबरलेल्या लहानग्यांचा अपघात टळला; समय सूचकता दाखवणाऱ्या दांपत्यांचा मंचर पोलिसांकडून सन्मान

Parner News : संसदेच्या इतिहासात प्रथमच सेवानिवृत्त शिक्षकांना खासदार लंके यांनी घडविले संसद दर्शन; शिक्षकांनी घेतला थेट अधिवेशनाचा अनुभव

SCROLL FOR NEXT