Sheena Bora e sakal
महाराष्ट्र बातम्या

शीना बोरा जीवंत असल्याचा दावा किती खरा? फॉरेन्सिक अहवालामधून समोर आले सत्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Murder Case) आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता या घटनेतील आरोपी इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जीवंत असून ती काश्मीरमध्ये असल्याचा दावा केला आहे. याबाबत तिने सीबीआयच्या संचालकांना पत्र (Indrani Mukherjee Letter To CBI) लिहिले असून काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी विनंती तिने सीबीआयला केली आहे. मात्र, इंद्राणीचा हा दावा कितपत खरा आहे? हे फॉरेंसिक अहवालावरून स्पष्ट होते.

इंद्राणीच्या पत्राबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. मात्र, या पत्राचं तितकं महत्वं नाही, असं सूत्रांचं म्हणणं आहे. कारण, त्यावेळी पोलिसांना सापडलेला मृतदेह हा शीना बोराचा होता, असं फॉरेन्सिक अहवालामधून स्पष्ट झालं होतं. तसेच तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने सांगितले की शीना बोराला तिने काश्मीरमध्ये पाहिले. यावरून इंद्राणीने ती जीवंत असल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनुसार, २०१२ मध्ये इंद्राणी मुखर्जीने कट रचून शीना बोराचा खून केला होता. यामध्ये मुंबई पोलिसांनी २०१५ मध्ये इंद्राणीच्या गाडीचा चालक श्यामवर राय याला अटक केली होती. शीना बोराची हत्या, त्यामध्ये इंद्राणीची भूमिका आणि मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याबाबत श्यामवर यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला होता.

फॉरेन्सिक अहवाल काय सांगतो? -

पोलिसांनी बाहेर काढलेला मृतदेह शीनाचा आहे की नाही याचा निष्कर्ष काढण्यासाठी अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. या मृतदेहाची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायंसेस (AIMS)च्या फॉरेन्सिक विभागाने या घटनेचा अहवाल तयार केला होता. यामध्ये देखील या मृतदेहाच्या सांगाडा हा शीना बोराचा असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये नमूद असलेल्या वैद्यकीय अहवालामध्ये देखील पोलिसांना सापडलेल्या सांगाड्यांची उंची, वय आणि लिंग हे सर्व शीना बोराशी मिळतेजुळते होते. तसेच तज्ज्ञांच्या टीमने देखील २३ वर्षीय शीना बोराचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला होता. अनेक फॉरेन्सिक तज्ज्ञांचे मत, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आरोपींचे जबाब आणि पुरावे यांच्या आधारे सीबीआयने शीना बोराची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला.

आता इंद्राणीने लिहिलेल्या पत्रानंतर या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आले आहे. पण, सीबीआयचे अधिकारी अद्यापही मौन बाळगून आहेत. इंद्राणीच्या पत्राची ते दखल घेतात की नाही हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT