महाराष्ट्र

"Youtubers माझ्यामुळे कोट्यधीश, त्यांना दिव्यांग मुलं होतील"

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर: किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत ते अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे! एका किर्तनामधून त्यांनी हे वक्तव्य केलं असून यावेळी पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरल्याचं दिसून आलं. या किर्तनात इंदुरीकर महाराजांनी त्यांचे व्हिडीओ टाकून पैसे कमावणाऱ्या युट्युबर्सवर सडकून टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असं सांगत असताना यांचं वाटोळंच होणार, असंही म्हटलंय. (Indurikar Maharaj)

अकोल्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सोमवारी त्यांचं किर्तन आयोजित केलं होतं. या किर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले आहेत.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

इंदुरीकर महाराज म्हणाले की, “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले आहेत. माझ्याच किर्तनाच्या क्लिप्स बनवून यांनी मलाच कोर्टात खेचलं. त्यामुळे यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” अशा शब्दात त्यांनी तोंडसुख घेतलं. पुढे त्यांनी यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही म्हटलंय. या किर्तनादरम्यान त्यांनी त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना अनेकदा ओरडून सांगितलं की व्हिडीओ काढू नका. त्यांच्या या संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.

यापूर्वीही महाराज वादात

  • इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा वादात सापडले आहेत. सम तिथीला स्त्रीशी संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं त्यांनी म्हटलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती.

  • मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

KKR vs MI Live Score IPL 2024 : पावसामुळे नाणेफेकीस उशीर

SCROLL FOR NEXT