Insulting text about Sambhaji Maharaj
Insulting text about Sambhaji Maharaj 
महाराष्ट्र

संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही. या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत एक भाषिक पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुरवण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याप्रकरणी तातडीने या पुस्तकाचे वितरण थांबवून लेखक, प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांनी केली होती. 

पुस्तकाचे वितरण थांबविण्याचे आदेश 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे उपसंचालक विकास गरड यांनी काल एक पत्रक काढून सदर पुस्तकाचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ पुस्तक वितरणाचे आदेश थांबवून चालणार नाही, तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या लेखक आणि प्रकाशकावर कारवाई केली पाहिजे. तसेच राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी, तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT