Interim bail granted to Bachchu Kadu
Interim bail granted to Bachchu Kadu  sakal
महाराष्ट्र

Bachchu Kadu News: बच्चू कडूंना मोठा दिलासा; जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics: प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारी कामांत अडथळा आणल्या प्रकरणी त्यांना कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.(Interim bail granted to Bachchu Kadu maharashtra politics )

बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१७ ला एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी रकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.

२०१७ साली नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती.

या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT