solapur zp
solapur zp sakal media
महाराष्ट्र

तुमचे उत्पन्न वार्षिक १ लाखांपर्यंत आहे का? ३ कागदपत्रे द्या अन्‌ मिळवा पिठाची गिरणी, झेरॉक्स मशिन

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग मागील चार महिन्यांपासून ॲक्टिव्ह झाला आहे. सेस फंडाची १०० टक्के रक्कम खर्च करण्यात या विभागाने बाजी मारली आहे. दोन हजार लाभार्थींना पिठाची गिरणी, झेरॉक्स मशिन देऊन समाज कल्याण विभागाने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला आहे. एक लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थींनी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मागासवर्गीय प्रमाणपत्र व रहिवासी दाखला देऊन अर्ज केल्यास त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जात आहेत.

पूर्णवेळ अधिकारी नसल्याने पिछाडीवर पडलेला समाज कल्याण विभाग आता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय लाभार्थींसह दिव्यांगांना वैयक्तिक योजनांचा लाभ देत आहे. मागील चार महिन्यात जिल्ह्यातील दोन-अडीच हजार लाभार्थींची लॉटरी पद्धतीने (‘सीसीटीव्ही’च्या नजरेत) निवडी करण्यात आल्या.

यावेळी पहिल्यांदाच मानवी हस्तक्षेप टाळण्यात आला. दुसरीकडे जिल्ह्यातील बाराशेहून अधिक गावांमधील दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी वितरित करण्यात आला. बचत गटांना अनुदान दिले. दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी दीड लाखांपर्यंत बीजभांडवल देखील या विभागामार्फत दिले जाते. समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला. २५ ते ३० हजारांपर्यंत असलेले लाभार्थी आता एक लाखांपर्यंत झाले आहेत. ग्रामसेवकांच्या माध्यमातून गटविकास अधिकारी (बिडीओ) यांच्याकडे अर्ज केल्यास लाभार्थींना संबंधित योजनेचा लाभ दिला जातो, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली.

MS-CIT व टॅलीचे मोफत प्रशिक्षण

सोलापूर जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे मोफत एमएससीआयटी व टॅलीचे प्रशिक्षण दिले जात आहे. मागील चार महिन्यात जिल्ह्यातील चार हजार विद्यार्थ्यांना मोफत एमएससीआयटी व तीन हजार मुला-मुलींना टॅलीचे प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय आहे.

लाभार्थींपर्यंत पोचवणार प्रत्येक योजना

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाच्या सर्व योजना लाभार्थींपर्यंत पोचवणे व मानवी हस्तक्षेप टाळून योजनांचा लॉटरी पद्धतीने लाभ देण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यातील वंचित लाभार्थींच्या शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- सुनील खमितकर, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT