Maratha Reservation  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : ....तर ९९ टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणं कठीण; मराठवाड्यात केवळ ४ हजार १६० कुणबी नोंदी

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी जरांगे पाटील आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नोंदी तपासण्यात येत आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. यामुळे, मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १९६७ पूर्वीच्या नोंदी शोधण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

याअंतर्गत ३३ लाख ९८ हजार महसूल आणि शैक्षणिक अभिलेखांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ४ हजार १६० अभिलेखांत कुणबी नोंद आढळून आली आहे. याबाबत विभागीय आयुक्त मघुकरराजे आर्दड यांनी महिती दिली आहे.

दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी घातलेली निजामकालीन वंशावळीची अट जीआरमधून काढली नाही, तर अभिलेखांनुसार ९९ टक्के मराठ्यांना कुणबीच्या आधारे आरक्षण मिळणं अशक्यप्राय होणार आहे.

प्रशासनाच्या वतीने आठ जिल्ह्यात हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा आदी बाबी तापण्यात आल्या. अधिक नोंदी तपासण्यासाठी प्रशासनाचं एक पथक आज अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हैद्राबादला जाणार असल्याचं विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT