Jalgaon Raid  esakal
महाराष्ट्र बातम्या

Jalgaon Raid : ''कामगार आमच्या पाठीशी, त्यांना आम्ही...'', ED च्या कारवाईनंतर मनीष जैन यांची प्रतिक्रिया चर्चेत

संतोष कानडे

Jalgaon Raid News : SBIकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणात ‘ईडी’ने सलग दोन दिवस राजमल लखीचंद ज्वेलर्स व अन्य आस्थापनांवर छापे टाकत तपासणी केली. तसेच संचालक तथा माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांना समन्स बजावले आहे. ईडीने लखीचंद ज्वेलर्समध्ये असलेला सोन्याचा साठा जप्त केला आहे.

याप्रकरणी आर. एल. समूहाचे मालक मनीष जैन यांनी ईडीच्या कारवाई संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी आमच्या सोबत असून त्यांनादेखील या कारवाईमुळे दुःख झालं आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही पुन्हा कंपनी सुरु करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं.

काय म्हणाले मनीष जैन?

ईडीला मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी आमच्याकडे येऊन कारवाई केली आहे. ईडीने आमच्या सर्वच व्यवसायांवर एकाच वेळेला छापेमारी केली. ज्वेलरी, रोकड त्याचबरोबर महत्त्वाचे दस्तावेज, आयटी सॉफ्टवेअर, ईडीचे अधिकारी जप्त करून घेऊन गेले. डायमंड तसेच सोन्याच्या ज्वेलरी ईडीचे अधिकारी जप्त करून घेऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं.

मनीष जैन पुढे म्हणाले की, ग्राहकांचा आर. एल. ग्रुपवर विश्वास आहे. ईडीच्या या कारवाईमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. परंतु आम्ही न्यायालयात जाऊ आणि जिंकू, बंद पडलेली कंपनी आम्ही पुन्हा सुरू करू.

200 ते 250 लोक आर.एल. ग्रुपमध्ये काम करतात. ईडीच्या या कारवाईमुळे कामगारांना देखील दुःख झालेले आहे. परंतु आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत. ईडीने आमच्यावर केलेल्या कारवाईवर मी राजकीय भाष्य करणार नाही.आम्ही न्याय देवतेकडे जाऊ आणि न्याय मागू, असं ते शेवटी म्हणाले.

काय आहे प्रकरण?

राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांत सुमारे ५०० कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. चार टक्के व्याजाने घेतलेल्या या कर्जाला बँकेने वसूल करताना नियमबाह्यपणे व्याजदर वाढवून, अतिरिक्त कर लावून थकबाकीची रक्कम वाढवून दिल्याचा दावा ईश्‍वरलाल जैन यांच्याकडून केला जात आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. या कर्ज प्रकरणात आर. एल.च्या संचालकांनी नियमबाह्यपणे सेटलमेंट केल्याचा आरोप आहे.

‘ईडी’कडून तपासणी

‘ईडी’ने गुरुवार (ता. १७)पासून राजमल लखीचंद ज्वेलर्ससह मानराज मोटर्स, नेक्सा अशा तिन्ही शोरूमवर छापेमारी करीत तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी ‘ईडी’च्या पथकांनी या तिन्ही आस्थापनांवर आपली तपासणी व चौकशी सुरूच ठेवली. या तपासणीत आवश्‍यक कागदपत्रे, नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्वेलर्समधील दागिन्यांसह अन्य साठा तसेच दुकानातील ९० लाखांची रोकड ‘ताब्यात’ घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT