Jalna News esakal
महाराष्ट्र बातम्या

'तो' अपघात नव्हताच! मूल होत नव्हतं म्हणून पत्नीला कारमध्येचं पेटवलं; घटनेने राज्यात खळबळ

संतोष कानडे

जालनाः २३ जून रोजी मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी आली होती. त्या कार अपघातात पत्नीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. मात्र प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

जालना जिल्ह्यातल्या परतूर येथे २३ जून रोजी घटना घडली होती. कारमध्ये पती-पत्नी प्रवास करत होते. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. आग लागताच पती बाहेर पडला मात्र पत्नीचा होरपळू मृत्यू झाला. सविता साळुंके असं होरपळून मृत झालेल्या महिलेचं नाव होतं.

या प्रकरणी आत मोठी अपडेट आलेली असून मूल होत नसल्याने पतीनेच पत्नीला मारल्याचा आरोप होत आहे. जालन्यातील तळणी-मंठा भागात ही घटना घडली आहे. अमोल साळुखे असं पतीचं नाव आहे. लग्नाला १३ वर्षे झाली तरी त्यांनी मूलबाळ नव्हतं.

पती अमोल हा त्याच कारणावरुन सविताला त्रास द्यायचा. शिवाय वारंवार घटस्फोट दे, अशी मागणी करायचा. परंतु सविता घटस्फोटाला तयार नव्हती.

या जळीतकांडाचा पोलिसांनी उलगडा केला असून अमोलने अपघाताचा बनाव केल्याचं समोर आलेलं आहे. पाच दिवसांमध्ये पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला आहे. क्रूरपणे पत्नीला जाळून ठार मारल्याप्रकरणी राज्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT