NCP Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन मंत्री आमने-सामने; जयंत पाटील म्हणाले, हा दोन्ही बाजू...

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मराठावाडा दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील, शिंदे समिती आणि सरकारवर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांनी आज उत्तर दिलं आहे. यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील मंत्र्यांमध्येच दुफळी दिसून येत आहे. या सर्व प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, हा दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रकार दिसतोय. काही लोकांनी या बाजूचं बोलायचं आणि काहींनी दूसऱ्या बाजूचं बोलायचं असं काही आहे का हे तपासलं पाहिजे. या बाबतीत सरकारने एकमत केलं पाहिजे.

मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री दुसरं बोलत आहेत आणि आता मंत्री वेगळं बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं एकमत करावं. आमची यावर भाष्य करण्यची इच्छा नाही असेही शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत.

दोन्ही समाजात वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे. कटूता निर्माण होऊ नये अशी शरद पवारांची देखील भूमिका राहिली नाही. यांना आरक्षण मिळत असेल तर दूसरीकडे कटूता निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार गटाला ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेल्या भरघोष यशाबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, स्थानिक विधानसभेचे आमदार म्हणून ते काम करतात, त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवला. पण राज्यात पक्षाच्या चिन्हावर निवडणूका होत नाहीत. त्यामुळे गावातील लोक एकत्र येऊन निवडणूक लढवतात. आगामी लोकसभा निवडणूकीत आणि ग्रामपंचयत निवडणूकीत खूप फरक असतो. लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात. एक वर्षानंतर विधानसभा होणार आहेत त्याला खूप वेळ शिल्लक आहे असे जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT