Jayant Patil|Sharad Pawar|Supriya Sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: "जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा...," आमदारांच्या घरवापसीवर जयंत पाटलांचे पहिल्यांदाच भाष्य

Ajit Pawar: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार यांनी आपल्या एकट्याच्या जिवावर त्यांच्या नव्या पक्षाचे 10 पैकी 8 खासदार निवडून आणले आहेत.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार यांनी आपल्या एकट्याच्या जिवावर त्यांच्या नव्या पक्षाचे 10 पैकी 8 खासदार निवडून आणले. यानंतर आज मुंबईत या नवनिर्वाचित खासदारांची शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीनंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये जयंत पाटील यांनी निवडणुकीतील विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 10 ते 15 आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा जयंत पाटील म्हणाले, रोहित पाटील यांच्या संपर्कात काही लोक असतील पण मला याबाबत कोणतीही कल्पाना नाही. त्यांनी यावर भाष्य केले आहे पण मला यावर काही बोलायचे नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी यावर बोलेन.

दरम्यान महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत भाजपसह महायुतीचा धुव्वा उडवला. यामध्ये राज्यात काँग्रेस सर्वा मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी 17 जागा लढवत 13 जागांवर विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जगांवर विजय मिळवला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या.

दुसरीकडे महायुतीमध्ये गेल्यावेळी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची यंदा 9 जागांवर घसरण झाली आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT