Eknath Khadse 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse: "वडीलकीच्या नात्याने सांगतो..."; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातूनच खडसेंचा आव्हाडांना घरचा आहेर

जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन असल्याचं वादग्रस्त विधान केलं. राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ते शिकार करून खायचे. त्यांच्या वक्तव्याबाबत राज्यात सत्ताधारी आक्रमक झाले आहेत.

Sandip Kapde

Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिर्डी येथील शिबीराचा आज समारोप आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कालचा दिवस चांगलाच गाजला. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन असल्याचं वादग्रस्त विधान केलं. राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ते शिकार करून खायचे. त्यांच्या वक्तव्याबाबत राज्यात सत्ताधारी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आता पक्षातील नेत्यांच्या टिकेचा देखील सामना करावा लागत आहेत. रोहित पवार यांच्यानंतर एकनाथ खडसे यांनी आव्हाडांना सल्ला दिला आहे. एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना वडीलकीच्या नात्याने सांगतो. त्यांनी अशी वक्तव्य करु नये. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशी वक्तव्य टाळावी.

जितेंद्रने काल विषय सांगितला की श्रीराम मांसाहारी होते. त्यांचे ते व्यक्तिगत मत असू शकते. ते पक्षाचे मत असेल असं मला वाटत नाही. ज्या ठिकाणी श्रद्धेचा, भावनेचा विषय असतो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे समोर निवडणुका असताना तर असे वादग्रस्त वक्तव्य टाळावे, असे मी त्यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला देतो. तो माझा अधिकार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

निवडणुका जिंकण्यासाठी संघटनेचे बळ हे लागत-

एकनाथ खडसे म्हणाले, "आतापर्यंत भाषण केलेल्या वक्त्यांनी आपल्यामध्ये ताकद निर्माण करून आपले सरकार निर्माण होईल असे जोशदायक वातावरण निर्माण केले आहे. आता पुढच्या महिन्यात कदाचित निवडणुकांची आचारसंहिता लागेल निवडणुका या वाऱ्यावर जिंकता येत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी संघटनेचे बळ हे लागतेच. संघटनेमध्ये कार्यकर्ता तयार झाल्यानंतर, सभासद नोंदणी, पक्षाचा सदस्य, सक्रिय सदस्य असेल तर कार्यकर्ता असा असला पाहिजे की, त्याला कोणत्याही आदेशाची वाट न पाहता काम करण्याची क्रिया केली गेली पाहिजे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

Mumbai News: मुंबईत १९ हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्रांमध्ये केलेले बदल रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय, कारण काय?

Latest Marathi News Live Update : वृद्धाला मारहाण प्रकरणी मनसेचा परप्रांतीय चालकांना दणका

Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

SCROLL FOR NEXT