

ISHA GROVER
ESAKAL
'रेडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री इवा ग्रोवर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं, तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलंसं केलं. आजही प्रेक्षक तिच्या अभिनयासाठी तिला ओळखतात. मात्र इवाने तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केलाय. इवाने आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली यांच्याहसी लग्न केलेलं. मात्र काही महिन्यातच तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलंय.