Kasaba Byelection  
महाराष्ट्र बातम्या

Kasaba Byelection : कसबा पोटनिवडणुकसंदर्भात शिंदे गटाने मांडली महत्त्वाची भूमिका

शिंदे गट कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणार

सकाळ डिजिटल टीम

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटाने महत्त्वाची भूमिका मांडली आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. (Kasaba Byelection BJP CM Eknath Shinde Deepak Kesarkar )

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. तसेच, बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. असेही केसरकर यावेळी म्हणाले.

काय म्हणाले केसरकर?

शेवटी युती अभेद्य आहे. त्यामुळे योग्य असा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही जागा भाजपच्या होत्या. युतीचे पालन केले जाईल. भाजपला पाठिंबा राहणार. माझ्या मते ही निवडणुक बिनविरोधा झाली पाहिजे.

राज्याची आत्तापर्यंतची एक परंपरा आहे. ज्याचे निधन झाले आहे. त्याच्या घरातील उमेदवार उभा राहिला तर निवडणुक बिनविरोध केली जाते. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. असही केसरकर यांनी स्पष्ट केलं.

ठाकरेंच्या नेत्याने आयफोन वापरण्याच्या सुचनेवरही केसरकर यांनी भाष्य केलं. आय फोन सहसा कोणाला परवडत नाही,पण आता ठाकरे गटाचे कार्यकर्ता कदाचित तेवढे श्रीमंत झाले असतील, पण माझ्या काळात तर सेनेत वडापाव खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ता होते, आताचं माहित नाही. असा खोचक टोमणा मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT