kashmiri students beaten up by yuvasena worker in yavatmal
kashmiri students beaten up by yuvasena worker in yavatmal 
महाराष्ट्र

आतंकवादाशी संबंध सांगून काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : येथे शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. 3 ते 4 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

वाघापूर परिसरातील वैभव नगर येथे बुधवारी (ता. 20) रात्री युवा सेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला सीआरपीएफ ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली. भारतीयांनी दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्या विरुध्द तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. या संतापालाच यवतमाळमध्ये शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांनाही सामोरे जावे लागले. हे विद्यार्थी यवतमाळमध्ये शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

या व्हिडिओत युवा सेनेचे कार्यकर्ते त्या तरुणांना नाव आणि काश्मीरमधून कुठून आले आहात? असे विचारत मारताना दिसत आहे. तसेच, काश्मीरमध्ये तुमचे कोण राहतात? आतंकवादी तुमचे कोण लागतात? असेही विचारत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. यावर 'आम्ही इथे शिक्षणासाठी आलो आहे. आम्ही चांगल्या कुटुंबातून आलो आहोत,'असे त्या काश्मिरी तरुणांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मीरी तरुणांना ‘वंदे मातरम’ बोलायला लावले.

लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनोले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, ओळख पटल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

Entertainment News: "मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत असताना..."; अभिनेत्रीनं सांगितला मालिकेत काम करताना आलेला धक्कादायक अनुभव

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

SCROLL FOR NEXT