खेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित घटना, इतिहास आणि त्यांच्या कार्याची माहिती सामान्य जनतेला मिळण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयामार्फत “टूर सर्किटद्वारे” प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच ७ व ८ डिसेंबरला कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौद्धलेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित विविध पैलूंची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांच्या जीवनाशी निगडित स्थळे व बुद्धिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन ‘टूर सर्किटचे’ मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या टूर सर्किटमध्ये विभागनिहाय मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या जिल्हयांमधील पर्यटनस्थळांचा समावेश केला आहे.
त्या अनुषंगाने कोकण विभागातून टूर सर्किटकरिता महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौद्ध लेणी या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ही एकदिवशीय सहल असून यासाठी पर्यटकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपाहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरवण्यात येणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य या अटीवर सहलीचे आरक्षण स्वीकारण्यात येणार आहे. ७ व ८ डिसेंबरच्या सहलीचे आगाऊ आरक्षण करणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षणासाठी तसेच सहलीसंदर्भात अधिक माहितीसाठी ddtourisum.kokan-mh@gov.in या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय कोकण विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.