

Cameron Green Bowling
esakal
इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा हंगाम सुरू आहे. आयपीएलमध्ये अनेक संघांना कोणत्या खेळाडूला खेळवायचे असे पेच असतात. या हंगामात देखील कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर अनेक चर्चा सुरू आहेत. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला पहिल्या सामन्यानंतर कॅमेरून ग्रीन का गोलंदाजी करत नाही अस विचारलं असता त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा अस मजेशीर उत्तर दिलं होतं. नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील यावर उत्तर दिल की तो पाठीच्या दुखापतीमूळे सुरुवातीच्या १० -१५ दिवस गोलंदाजी करू शकणार नाही. पण सनराइजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट राइडर्स यांच्या सामन्याअगोदर कॅमेरून ग्रीनला नेट्समध्ये गोलंदाजी करताना बघितल गेल आणि हा चर्चेचा विषय बनला.