kirit somaiya Udhhav Thackeray
kirit somaiya Udhhav Thackeray esakal
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक, सोमय्यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास अघाडीच्या अनेक नेत्यांवर गैरकारभार केल्याचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांचा मोर्चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांच्याकडे वळवला आहे. किरीट सोमय्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबियांवर मोठे आरोप केले आहेत. दरम्यान त्यांनी उध्दव ठाकरेंच्या मेव्हण्यांची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या संबंधी मुख्यमंत्र्याना उत्तरे द्यावी लागतील असे सोमय्या यावेळी म्हणाले.

अजित पवार यांच्या प्रकरणी बोलताना सोमय्या म्हणाले की, 9 दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे. हे 1000 कोटींचे बेनामी व्यवहार असून यात 15 मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला. सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक मालक असल्याचे सोमय्या म्हणाले.

बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या असून हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या खाली कंपन्या या करतात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरूपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री स्वत:चा कारखाना विकत घेतात. यांचेच बिल्डर कंपन्या विकत घेतात, असा आरोपही सोमय्या यांनी केला. यावेळी ईडी आणि सीबीआय त्यांचं काम करतच राहणार, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT