Anil parab Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya Viral Video : 'ती' महिला कोण? महाराष्ट्राला कळायला हवं; अनिल परबांची सभागृहात मागणी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका आक्षेपार्ह व्हिडिओवरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Mumbai News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका आक्षेपार्ह व्हिडिओवरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या महिलेनं हे व्हिडिओ समोर आणले आहेत, ती महिला नेमकी कोण आहे? हे महाराष्ट्राला कळायला हवं अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. (Kirit Somaiya viral video Maharashtra news Anil Parab demand in Vidhan Parishad)

परब म्हणाले, गेल्या वर्षी खालच्या सभागृहात पेनड्राईव्ह फुटले आज वरच्या सभागृहात तो फुटतोय. कोणाच्याही राजकीय आयुष्यात बदनामी काय असते. एखाद्याच्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा तो व्यक्ती किती त्रस्त होतो, याचे आम्ही साक्षीदार आहोत.

छगन भुजबळ इथं बसलेत ते अडीच वर्षे तुरुंगात होते, न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलं. तुमच्या राजकीय करियरवर जे आरोप होतात, त्यामुळं त्यांची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होतात. ज्यांचा व्हिडिओ बाहेर आला आहे त्यांनी अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत.

त्यामुळं या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी व्हायला हवी. तसेच ज्या महिलेनं हा व्हिडिओ समोर आणला आहे ती महिला नेमकी कोण आहे? हे महाराष्ट्राला कळायला हवं, अशी मागणी यावेळी अनिल परब यांनी सभागृहात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: कॅप्टन शुभमन गिलचे शतक! भारतीय संघाचे इंग्लंडला सडेतोड उत्तर; पायात क्रॅम्प आल्यानंतरही मैदानावर उभा राहिला

ENG-U19 vs IND-U19: १५ चेंडूंत ७८ धावांचा पाऊस! वैभव सूर्यवंशीचे शतक हुकले; इंडियाने इंग्लंडची उडवली झोप, मालिकेत आघाडी

Modi Traffic Challan : ..अन् ‘त्या’ पठ्ठ्यानं थेट मोदींनाच वाहनावरील थकीत दंड लवकर भरण्यास सांगितला!

Bacchu Kadu Interview : ''फडणवीसांच्या फोनमुळे गुवाहाटीला जाणारा बच्चू कडू नाही'' , स्वत:च सांगितलं जाण्यामागचं नेमकं कारण...

ENG-U19 vs IND-U19: ९ षटकार, ६ चौकार! वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी, थोडक्यात हुकली Century; इंग्लंडची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT