Pravin Darekar Bhagatsingh Koshyari Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यपाल ही आमची शेवटची आशा - प्रवीण दरेकर

किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि बोगस एफआयआर प्रकरणी भाजपा नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या नावाने पोलिसांनी बोगस एफआयआर दाखल केला, असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्या प्रकरणी सोमय्या यांनी दिल्लीत गृहसचिव आणि गृहराज्यमंत्र्यांनंतर आज राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपा नेत्यांसह आज राज्यपालांची भेट घेतली.

किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या बोगस एफआयआऱ प्रकरणी गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, सुनील राणे मंगल प्रसाद लोढा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अर्धा तास झालेल्या या चर्चेनंतर प्रवीण दरेकर तसंच किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर दाखल केलेल्या बोगस एफआयआरबद्दल राज्यपालांशी चर्चा केली. पोलिसांमार्फत सुरू असलेला दहशतवाद राज्यपालांच्या कानावर घातला आहे. हा खोटा एफआय़आर मागे घेण्यात यावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. तसंच सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी सरकारने बघ्याची भूमिका घेतली असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

हे सरकार सूडाने पेटलेलं आहे. किरीट सोमय्या या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने त्यांना नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे एक शेवटची आशा म्हणून आम्ही राज्यपालांकडे आलो आहोत असं प्रवीण दरेकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यानंतर किरीट सोमय्या यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, आपण राज्यपालांकडे पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच बनावट एफआयआर रद्द करून खरी एफआयआर का घेत नाही? असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT