chandrkant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

पाटील-संपतबापूंत खलबते ; आवाडे-कोरे-महाडिकांशी भाजपची युती?

नव्या पर्यायांची चाचपणी; आबिटकर-नरकेही सोबत; महाडिक, आवाडे, कोरेंसाठी प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (Bank Election) निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रबळ पर्याय देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी जोडण्या सुरू केल्या असून त्यात आमदार प्रकाश आबिटकर, (Prakash Abitkar) माजी आमदार चंद्रदीप नरके, (Chandradeep Narke) संपतबापू पवार-पाटील यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल (ता. ११) आमदार पाटील व संपतबापू यांच्यात यासंदर्भात बैठकही झाली. दरम्यान, या पर्यायासोबत आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही यावे यासाठी आमदार पाटील प्रयत्नशील आहेत.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाच बँकेत वापरला जाणार असे जाहीर केले; पण यात शिवसेनेला आता असलेल्या दोन जागा व्यतिरिक्त जादा जागा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आबिटकर यांनाच हे मान्य नसल्याने त्यांच्याकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच यावर प्राथमिक चर्चा झाली होती; पण त्यावेळी आता उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेल्या आबिटकर यांच्यासह संपतबापू व श्री. नरके यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले; पण कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आल्यानंतर या घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. त्यातूनच आज चंद्रकांत पाटील-संपतबापू यांच्यात खलबते झाली.

निवडणुकीत विकास संस्था गटातील बारा जागा सोडून उर्वरित नऊ जागांपैकी जास्तीत जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

निवडणुकीत विकास संस्था गटातील बारा जागा सोडून उर्वरित नऊ जागांपैकी जास्तीत जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचा सुरू आहे. त्यासाठी कोरे, आवाडे व महाडिक यांनाही सोबत घेण्याची तयारी चर्चेच्या माध्यमातून सुरू होती. तोपर्यंत जागा वाटपावरून शिवसेनेचे श्री. आबिटकर व नरके हेच यातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी असेल तर जिल्हा बँकेत शिवसेनेला समान वाटा हवा अशी या दोघांची भूमिका असल्याचे समजते. आबिटकर स्वतःच्या भावासाठी तर नरके, पवार-पाटील कार्यकर्त्यासाठी आग्रही आहेत. याबाबत पवार-पाटील यांनी आबिटकर यांच्याशी प्राथमिक चर्चाही केल्याचे समजते; पण शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वाकडून काही आदेश आले तर नरके-आबिटकर भूमिकेवर ठाम राहतील का ? याविषयी भाजपचे चंद्रकांत पाटील साशंक आहेत.

कोरे यांनीही सत्ताधाऱ्यांकडे अजून दोन तर श्री. आवाडे यांनी किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. सद्या कोरे यांच्यासह त्यांचे दोन संचालक आहे तर आवाडे यांचे एक संचालक आहेत. शिवसेनेला सोबत घ्यायचे झाल्यास या दोघांना वाढीव जागा देणे सत्ताधाऱ्यांना शक्य नाही. याच मुद्यावर आवाडे-कोरे-महाडिक यांनाच भाजपसोबत घेण्याच्या हालचाली चंद्रकांत पाटील यांच्या पातळीवर सुरू आहेत; पण सत्ताधाऱ्यांसोबतच्या चर्चेत हे तिघेही पुढे गेल्याने ते पुन्हा माघारी जातील का ? हा प्रश्‍न आहे.

करवीरचे राजकारण

विधानसभा निवडणुकीत करवीरमधून पी. एन. पाटील यांनी श्री. नरके यांचा पराभव केला. आता महाविकास आघाडीत पी. एन. मुख्य घटक असताना त्यांच्यासोबत जाणे श्री. नरके यांच्यादृष्टीने अडचणीचे आहे. भविष्यातील राजकारणाचा विचार करूनच श्री. नरके संपतबापू यांच्यासह भाजपसोबतच्या चर्चेत सहभागी असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT