Anil Parab  sakal media
महाराष्ट्र बातम्या

पगारवाढीनंतरही संप सुरू ठेवल्यास वाढीबाबत पुर्नविचार करणार : परब

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकारने संपावर तोडगा काढून पगार वाढ केली. पगार वाढ दिल्यानंतर काही कामगारांनी कामावर रुजू होण्याची सहमती दर्शवली आणि कामगार कामावर रुजू झाले. सर्व कामगार कामावर रुजू होतील तेव्हा त्यांच्या ग्रेडवर चर्चा होईल अशी माहिती एसटी कृती समितीची बैठक झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. आज संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माहिती दिली.

पुढे ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक घेऊन कर्मचार्‍यांच्या मानसिकतेवर चर्चा करण्यात आली. याचबरोबर कामगारांच्या गैरसमजाबाबत ही चर्चा करण्यात आली. पगारवाढ मूळ वेतनात दिल्याने ग्रेडवर फरक पडेल का यावर चर्चा झाली. सर्व कामगार कामावर रुजू होतील तेव्हा त्यांच्या ग्रेडवर चर्चा होईल अशीही माहिती परब यांनी दिली.

कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही. संप संपल्यानंतर यावरती तोडगा काढला जाईल. कोणताही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्या वर जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे. त्याचबरोबर कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही याची देखील जाणीव करून दिली आहे.असे ही ते म्हणाले.

दरम्यान, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, अहमदनगर, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,वर्धात एसटी डेपो बंद आंदोलन सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT