महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojna: 'या' तारखेला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता; मंत्री तटकरे यांची माहिती

Aditi Tatkare: आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत असून सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचे लाभ वितरित करण्यात येतील.

संतोष कानडे

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्रित जमा झाले होते. आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. आता तिसऱ्या हप्याची तारीख जाहीर झाली आहे.

२९ सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. रायगडमध्ये योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून तेव्हाच २ कोटी महिलांना तिसरा हप्ता वितरित करण्यात येईल, असं मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी सांगितलं.

आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत असून सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचे लाभ वितरित करण्यात येतील.

त्या पुढे म्हणाल्या, ज्या महिलांना स्क्रूटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. २ कोटी महिलांना लाभ दिले जाणार असून लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

दोन हप्त्यांचा एकत्रित लाभ

ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत, अशी माहिती रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात दिली होती.

लाभार्थ्यांसाठीचे निकष

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी महिलांनाच दिला जातो

  • योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

  • 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात

  • जर महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा कर भरत असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Kolhapur Water Crisis : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 10 नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू; पाटबंधारे विभागाचा मोठा निर्णय, शेती पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तरुण पुरुषांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांची घनता कमी होण्याचं प्रमाण का वाढतंय? धक्कादायक कारणं समोर

प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका; कुठे कधी? अमोल कोल्हेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT