BJP ESakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Elections: विधानसभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

Haji Arafat Sheikh News: नितेश राणेंमुळे भाजप नेते हाजी अराफत शेख पक्ष सोडण्याची शक्यता आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Vrushal Karmarkar

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा फटका बसू शकतो. भाजपचे मुस्लिम नेते हाजी अराफत शेख पक्ष सोडण्याची शक्यता आहे. भाजपच्या काही नेत्यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे अरफत शेख संतापले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नुकतेच नितीश राणेंच्या वक्तव्यावरून शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसीर, भाजप नेते हाजी अराफत शेख भाजप पदाचा राजीनामा देणार सूत्रांची माहिती आहे. मुस्लिम समाज विरोधात भाजप नेते नितेश राणे वारंवार भूमिका घेत आहेत. त्यामुळे हाजी अराफत शेख नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी हाजी अरफत शेख उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहीर करतील आणि पक्ष सोडण्याची घोषणाही करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोण आहेत हाजी अराफत शेख?

हाजी अराफत शेख हे अयोध्येतील राम मंदिराच्या जागी धनीपूरमध्ये मशीद बांधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. हाजी अराफात शेख यांना मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला विकास समितीचे अध्यक्ष आणि निधी उभारण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सदस्य बनवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

UP तील महिलांना मिळणार ५० हजारांची मदत? निवडणुकीपूर्वी २० हजारांचा हप्ता देण्याचा प्रस्ताव

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण! स्वातंत्र्यदिनाआधी सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त; पाहा ताजा भाव

Marathi News Live Updates : पुणे जिल्ह्यात ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

Hardik Pandya Trade : 'तो मला संघासोबत नको, तर मी येतो...'! हार्दिकचा राग, कोलकाता नाइट रायडर्ससमोर अट अन् वाढली कटकट

SCROLL FOR NEXT