Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : पवारांची राहुल गांधींना साथ! राष्ट्रवादीचे नेतेही होणार आंदोलनात सहभागी

रोहित कणसे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी देखील गमवावी लागली आहे. यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून देशव्यापी सत्यागृह आंदोलन केले जात आहे. या दिल्लीत या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले.

महाराष्ट्रासह पाच राज्यात काँग्रेसकडून हे मौन आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेस मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन सुरु आहे. या मौन सत्याग्रहासाठी काँग्रेसचे नेते उपस्थित झाले आहेत.

यादरम्यान शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे नेतेही काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार असल्याने, राहुल गांधींवर झालेल्या कारवाई विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी एकवटल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान या आंदोलनात काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT