licensed weapons will have to be deposited solapur vidhan parishad election

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

विधान परिषदेच्या १६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांना १ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. ४ जून रोजी दुपारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी, या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या सदस्यांना त्यांच्याकडील वैयक्तिक परवान्याची शस्त्रे स्थानिक पोलिसांकडे जमा करावी लागणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : विधान परिषदेच्या १६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांना १ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. ४ जून रोजी दुपारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी, या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या सदस्यांना त्यांच्याकडील वैयक्तिक परवान्याची शस्त्रे स्थानिक पोलिसांकडे जमा करावी लागणार आहेत. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तसे आदेश काढले आहेत.

सोलापूर विधान परिषदेसाठी जिल्ह्यात ६१६ मतदार आहेत. त्यात सोलापूर महापालिकेतील १११ नगरसेवक आहेत, बाकीचे सगळे मतदार ग्रामीण भागातील आहेत. विधान परिषदेच्या ग्रामीणमधील ५०५ मतदारांपैकी अनेकांकडे वैयक्तिक परवान्याच्या बंदुका आहेत. त्या सर्वांना निवडणूक होऊन मतमोजणी होईपर्यंत शस्त्रे स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करावी लागणार आहेत. मात्र, २०१५ मधील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी शस्त्रे जमा करण्याचे आदेश झालेले नव्हते, असे त्यावेळचे काही सदस्य सांगतात. परंतु, मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी किंवा दहशत पसरविण्यासाठी त्या शस्त्रांचा वापर होऊ शकतो, म्हणून शस्त्रे जमा करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदार सदस्यांकडील शस्त्रे जमा करून घेण्यास सांगण्यात आले आहे. ३ जूनपूर्वी शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. दरम्यान, २०१५ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सदस्य उमेदवारांकडील शस्त्रे जमा केल्याचे रेकॉर्ड पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे यावेळी शस्त्रे जमा करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

मतदारांना जमा करावी लागतील शस्त्रे

सोलापूर विधान परिषदेसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होईल. १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तत्पूर्वी, ज्या मतदार सदस्यांकडे वैयक्तिक परवान्याची शस्त्रे आहेत, ती स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करायची आहेत.

- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

वैयक्तिक बंदोबस्त असलेल्यांचाही मागविला अहवाल

सोलापूर ग्रामीणमधील २२ व्यक्तींना त्यांच्या स्वसंरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त दिलेला आहे. त्यातील चौघांना न्यायालयातून तर पाच जणांना सशुल्क बंदोबस्त आहे. उर्वरित १३ जणांना खरोखर सध्या वैयक्तिक पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता आहे का, याचा अहवाल देखील पोलिस अधीक्षकांनी मागविला आहे. दरम्यान, २०१८ मधील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांना देखील पोलिस संरक्षण दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT