महाराष्ट्र

बिबट्याचा मृत्यू बीफ खाल्ल्यामुळे ; न तपासताच दिले मांस

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांना सोमवारी खायला दिलेल्या बीफमुळे विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बीफ खायला देण्यापूर्वी त्याची तपासणीच करण्यात आली नसल्याचा प्रकार उघड झाल्याने उद्यान प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे, असा आरोप प्राणिमित्र संघटनांनी केला आहे. 

विषबाधा झाल्याने सूरज या दहा महिन्यांच्या बिबट्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला, तर आणखी एक बिबट्या अत्यवस्थ आहे. चार-पाच बिबट्यांना सोमवारी सायंकाळी खाण्यासाठी बीफ देण्यात आले होते. हे बीफ खायला देण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यात आली नव्हती, असे उघड झाले आहे. याला उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांनी दुजोरा दिला. नेहमीच बीफची तपासणी केली जात नाही. अधूनमधून ती केली जाते. बिबट्यांना दिलेले बीफ हे सीलबंद होते; त्यामुळे ते तपासण्यात आले नाही, असेही ते म्हणाले. या संदर्भात आम्ही अंतर्गत चौकशी केली आहे. ठाणेवाला हा कंत्राटदार तीन-चार वर्षे उद्यानातील प्राण्यांसाठी बीफ पुरवत आहे. त्याचीही चौकशी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

बिबट्यांचे खाणे न तपासण्याच्या हलगर्जीपणाबद्दल प्राणिमित्र संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राण्यांना दिले जाणारे बीफ रोज तपासले जात नाही, हे अत्यंत चुकीचे आहे. सर्व प्राण्यांचे अन्न रोज तपासले जावे, अशी मागणी फॉरेस्ट ऍण्ड वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी या प्राणिमित्र संघटनेचे प्रमुख कृष्णा तिवारी यांनी केली. 

वैद्यकीय अहवालानंतर कारवाई 

सूरजची जुळी बहीण तारानेही हे बीफ खाल्ले होते. तिने लगेचच उलटी केल्याने ती वाचली. बिबट्यांना खायला दिल्यापैकी उरलेले बीफ; तसेच सूरजच्या शरीराच्या काही अवयवांसह, ताराला झालेली उलटीही तपासणीसाठी कालिनाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. त्याच्या अहवालानंतरच पुढील चौकशी होईल, असे उद्यानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT