Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis : "या मुख्यमंत्र्यांना अन् उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल कोणाच्या बापाची हिम्मत नाही"

कर्नाटकसोबत इंच इंच जागेसाठी लढा देऊ फडणवीस यांची ग्वाही

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकसोबत इंच इंच जागेसाठी लढा देऊ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठराव मांडण्यासंदर्भात संमती दर्शवली आहे. कर्नाटक सिमेवरील मराठी बांधवांना महाराष्ट्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देत कर्नाटकविरोधात इंच इंच जागेसाठी लढा देऊ, असे आज फडणवीस यांनी सभेत सांगितले आहे. मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने कर्नाटकविरोधात ठराव उद्या, मंगळवारी घेण्यात येईल, असे स्पष्ट करीत त्यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सभेत प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी कर्नाटकविरोधात ठराव आज घेण्याबाबत चर्चा झाली होती, हा ठराव आला नसल्याने नाराजी व्यक्त करीत चर्चेची मागणी केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करीत महाराष्ट्राला डिवचले जात आहे, परंतु महाराष्ट्र सरकार गप्प बसले असल्याचा आरोपही पवार यांनी केला. त्यांनी जशास जसे उत्तर देण्याची मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बघ्याची भूमिका न घेता कर्नाटक सरकारला गंभीर इशारा देण्याची मागणी केली. कर्नाटकमध्ये निवडणूक असल्याने त्यामुळे तेथील मुख्यमंत्री जाणीवपूर्वक भडक व्यक्तव्य करीत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. यावर फडणवीस यांनी या मुद्दयावर सभागृह एकमत असून मुख्यमंत्री आज दिल्लीला गेल्याने उद्या ठराव घेणार असल्याचे सांगितले.

सीमा प्रश्नावर बोलताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आम्हाला मान खाली घालायला लावायची कुणाच्या बापाची हिंमत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. फडणवीस यांनी उद्या ठराव घेणार असल्याचे सांगताच सेनेचे सदस्य आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते ठराव करीत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मान खाली घालुन बसल्याचा आरोप केला. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही, असे सांगितले आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांना कामकाजात सहभागी करून त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने, ते आल्यानंतर यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. यावर विरोधकांनी सभात्याग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT