vijaykumar deshmukh SAKAL
महाराष्ट्र बातम्या

‘PFI’च्या नावे भाजप आमदारास धमकीचे पत्र! मोदी, शहा, पवार, फडणवीसांनाही धमकी

केंद्र सरकारने ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर नुकतीच बंदी घातली आहे. तो राग मनात धरून एका व्यक्तीने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठविले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, योगी आदित्यनाथ यांचीही नावे आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारने ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर नुकतीच बंदी घातली आहे. तो राग मनात धरून एका व्यक्तीने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठविले आहे. टपालातून त्यांना ४ ऑक्टोबरला घरपोच पत्र मिळाले असून त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची तातडीने भेट घेतली. त्यानंतर पत्रातील ‘त्या’ व्यक्तीचा शोध गुन्हे शाखा व ‘एटीसी’ने सुरु केला आहे.

दहशतवाद्यांशी संबंध ठेवून देशविघातक कृत्य करण्याच्या तयारी असल्याच्या कारणातून ‘पीएफआय’ संघटनेवर घातली गेली. त्या निर्णयाला काही दिवस होताच सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार देशमुख यांना एकाने धमकीचे पत्र पाठविले आहे. आमच्या संघटनेवर बंदी घातली, काही फरक पडणार नाही, असेही त्यात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख ऐकेरी करण्यात आला आहे. दरम्यान, पत्राचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त डॉ. माने यांनी संबंधित यंत्रणेला सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. शहर गुन्हे शाखेने त्या पत्रातील नमूद पत्त्यावर व परिसरात जावून त्या व्यक्तीचा शोध घेतला. पण, त्या नावाचा कोणीही व्यक्ती त्याठिकाणी नसल्याची बाब समोर आली. तरीपण, कोणी खोडसाळपणा केला की दुसऱ्याच्या नावाने कोणी पत्र लिहिले की ते खरेच संघटनेशी संबंधित कोणी पाठविले, या बाबींचा तपास पोलिस करीत आहेत.

‘त्या’ पत्रातील मजकूर

‘विजयकुमार अब सुरू हो गया असली जंग, तुम्हारा नरेंद्र मोदी व अमित शहा इन्होने जो गलत काम किया है’. उसे उसका परिणाम भुगतना पडेगा’ असा मजकूर त्या पत्रात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही त्या पत्रात उल्लेख आहे. आयोध्या, मथुरा, काशी ही ठिकाणे आमचे ‘सुसाईड बॉम्बर’ एका दिवसात उडवतील, अशीही त्यात धमकी देण्यात आली आहे.

आसिफ शेखला मंगळवारपर्यंत कोठडी

‘पीएफआय’शी संबंधित आसिफ अस्लम शेख याला काही दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, विजापूर नाका पोलिसांनी पुन्हा बाजू मांडत त्याची कोठडी ११ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. त्याचा मोबाइल व त्याच्याकडे मिळालेल्या ‘सीडी’चा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सखोल तपास केला जातोय

आमदार विजयकुमार देशमुख यांना कोणीतरी धमकीचे पत्र पाठविले असून त्यात केंद्रीय नेत्यांची पण नावे आहेत. पत्रातील व्यक्तीचा शोध घेतला जात असून सखोल तपास सुरु आहे.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

West Bengal election: भाजपने संधी दिली अन् भांडी घासणारी महिला झाली आमदार; कलिता मांझींचा थक्क करणारा प्रवास!

WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

ऋतुराजचा विक्रम धोक्यात? Sanju Samson ने एकाच हंगामात दोनदा केला 'हा' पराक्रम; दिल्लीच्या गोलंदाजांचा उडवला थरकाप

SCROLL FOR NEXT