लिंगाणा ट्रेक पूर्ण केल्यानंतर चैत्राली कारेकर आणि सात्त्विक.
लिंगाणा ट्रेक पूर्ण केल्यानंतर चैत्राली कारेकर आणि सात्त्विक. 
महाराष्ट्र

चिमुरड्यासह ‘हिरकणी’कडून लिंगाणा सर (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - एका ‘हिरकणी’ने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह काळजात धडकी भरविणारा ३१०० फूट उंचीचा लिंगाणा किल्ला अडीच तासांत सर केला आहे.

इंटेरिअर डिझायनर असलेल्या चैत्राली कारेकर असे या ‘हिरकणी’चे नाव असून, सात्त्विक असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. कारेकर या गेल्या सात वर्षांपासून ‘बा रायगड परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून ट्रेकिंग करीत आहेत. ‘लिंगाणा’ चढताना सुरक्षेसाठी बेल्ट, दोरखंड याचा वापर केला. कडा चढताना प्रत्येक वेळी संस्थेचे सागर नलावडे व प्रशांत नाईक यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने हा कठीण ट्रेक आम्ही पूर्ण केला, असे कारेकर यांनी सांगितले.

या ट्रेकमध्ये सात्त्विकसह नऊ वर्षांचा वीरेन कडू, चौदा वर्षांची वेदांती घोलप हेदेखील सहभागी झाले होते. सध्या लहान मुले मोबाईलमध्ये गुंग असतात. मात्र, या मुलांनी हा ट्रेक पूर्ण करून वेगळाच पराक्रम केला आहे, असे ‘बा रायगड परिवारा’चे नाईक यांनी सांगितले.

सुरक्षेशिवाय ट्रेकिंग नकोच 
ट्रेकिंगला जाताना सर्वांत प्रथम सुरक्षेला महत्त्व देणे गरजेचे आहे. सेफ्टी बेल्ट, दोरखंड असले तरी जाणकार व्यक्ती, वाटाड्या यांच्याशिवाय ट्रेक करू नये. अतिउत्साहात हुल्लडबाजी केल्याने दुर्घटना घडून काहींचा जीव जातो. त्यामुळे सुरक्षेची पूर्ण तयारी केल्याशिवाय ट्रेकिंग करू नये, असे नाईक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT