महाराष्ट्र बातम्या

जालना, जळगावमध्ये अतिवृष्टी; चाळीसगावात अनेक जनावरे वाहून गेल्याची भीती

सकाळ डिजिटल टीम

राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता शेवटच्या आठवड्यात मुसळधार कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगावात अनेक नागरिक पुरामध्ये अडकले असून शेकडो जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी मंडळात तब्बल 121.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चाळीसगावातील या गावांना पुराचा वेढा..

तर अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे.चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे, अनेक गावांचा संपर्क तुटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी काठच्या गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात २ व्यक्ती अडकले असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एसडीआरएफचे पथकबचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.

जालना जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी 603.10 मिलिमीटर आहे. दोन महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी पार झाली असून एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 667.40 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT