Ladki Bahin

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींना यंदा ३०० कोटींचे कर्ज; एक लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी, तीन लाखांपर्यंत ७ टक्के व्याजदर, वाचा...

सुरवातीला ३० हजार ते एक लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या बचतगटाची क्षमता आता तीन ते दहा लाखांपर्यंत पोचली आहे. बचतगटाला मिळालेली रक्कम समानप्रमाणात महिला वाटून घेतात आणि त्यातून ते आपापले व्यवसाय करतात. त्या कर्जाची महिला न चुकता नियमित परतफेड देखील करतात. त्यामुळे दरवर्षी बचतगटांना मिळणारे कर्ज उद्दिष्टापेक्षा अधिक असते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुमारे ३०० कोटींचे कर्जवाटप होणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून पुढील महिन्यात कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य प्राप्त होणार आहे. दरम्यान, गतवर्षी बचतगटांना बॅंकांकडून ३४० कोटींचे कर्जवाटप झाल्याचे ‘उमेद’चे (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात २४ हजार २०० बचतगट असून त्याअंतर्गत अडीच लाख महिला जोडलेल्या आहेत. ‘उमेद’च्या माध्यमातून बचतगटातील महिलांना वेळोवेळी आर्थिक मदत झाली आहे. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे एक लाख कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे. दरवर्षी बचतगटातील महिला ‘उमेद’च्या मदतीने बॅंकांकडून कर्ज घेतात आणि त्याची नियमित परतफेड देखील करतात. ३० हजारांवर महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले असून त्यातून अनेकांचे ब्रॅंण्ड तयार झाले आहेत. रूक्मिणी महोत्सव असो की राज्य शासनाच्या माध्यमातून मोठमोठे महोत्सव, त्यात बचतगटातील उद्योजक महिला सहभागी होतात. त्यातून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळू लागली आहे.

सुरवातीला ३० हजार ते एक लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या बचतगटाची क्षमता आता तीन ते दहा लाखांपर्यंत पोचली आहे. बचतगटाला मिळालेली रक्कम समानप्रमाणात महिला वाटून घेतात आणि त्यातून ते आपापले व्यवसाय करतात. त्या कर्जाची महिला न चुकता नियमित परतफेड देखील करतात. त्यामुळे दरवर्षी बचतगटांना मिळणारे कर्ज उद्दिष्टापेक्षा अधिक असते. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड झाल्यास बॅंकांकडून व्याजदरात सवलत देखील मिळते.

सोलापूर जिल्ह्यातील बचतगट

  • एकूण बचतगट

  • २४,२००

  • बचतगटाशी संलग्नित महिला

  • २.५० लाख

  • यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य

  • ३०० कोटी

  • गतवर्षीचे कर्जवाटप

  • ३४० कोटी

तीन लाखांपर्यंत ७ टक्क्यांनी कर्ज

बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या ज्या बचतगटांनी कर्जाची परतफेड नियमित भरले, त्यांना दहा लाखांपर्यंत कर्ज मिळते. तीन लाखांपर्यंत कर्ज सात टक्के व्याजदराने मिळते. त्यावरील कर्जासाठी वेगवेगळ्या बॅंकेचा व्याजदर कमी-अधिक असतो. एक लाखांपर्यंत कर्ज घेऊन त्याची परतफेड वेळेत केल्यास त्या कर्जाचा व्याज परतावा सरकारकडून दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातील ९५ टक्क्यांहून अधिक बचतगटांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT