lok sabha election 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

lok sabha election 2024: 'शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवणार' अन् ४० जागा मविआ जिंकणार ठाकरे गटाचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटप करताना जिंकेल, त्याची जागा असे सूत्र असायला हवे. तसेच शिवसेनेच्या लोकसभेच्या १८ जागा असल्याने त्या आम्ही लढवणारच असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

आगामी निवडणुकीत राज्यात ४० जागा महाविकास आघाडी जिंकेल असाही दावा त्यांनी केला.राऊत हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. ते म्हणाले की, राज्यातील ४८ जागांचा आढावा काँग्रेससह सर्वच पक्षांनी घेतला पाहिजे. त्यावरून कोणाची ताकद कोठे आहे हे लक्षात येईल.

महाविकास आघाडीतील जागा वाटपावर जाहीर चर्चा करता येणार नाही. मात्र प्रत्येक पक्ष आपल्या जागांचा आढावा घेत आहे. त्यात वावगे असे काही नाही. राज्यात महाविकास आघाडीला ४० जागा जिंकायच्या आहेत, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

लोकसभा निवडणूक जिंकणे हे आमचे लक्ष असून त्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचेही कष्ट आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते, त्या जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढवेल.

संजय राऊतांचे थुंकणे वादात

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत अजून एका वादात सापडले आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच राऊत वार्ताहराच्या माईकसमोर थुंकले; तर शुक्रवारी दुसऱ्यांदा दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारताच राऊत यांनी पुन्हा तीच कृती केली.

महाविकास आघाडीतील नेत्यानींही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यानंतर सावरासावर करत ‘माझ्या जिभेला त्रास झाल्याने मी थुंकलो’, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT