Sanjay kakade
Sanjay kakade 
महाराष्ट्र

LokSabha 2019 : भाजप, काँग्रेसने नाकारल्यास संजय काकडे यांच्याकडून लढणार का?

सकाळवृत्तसेवा

पुणे : संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असून, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संभाजी ब्रिगेड'चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी संतोष शिंदे इच्छुक आहे. खासदार संजय काकडे यांची उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी सुरू आहे. परंतु काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही. भाजपला काकडे यांची किंमत नाही, आणि काँग्रेस काकडे यांना स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ काकडेंनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा 'संभाजी ब्रिगेड'मध्ये सहभागी व्हावे आणि काकडेंनी 'संभाजी ब्रिगेड' कडून लोकसभा निवडणूक लढवावी, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, पुण्याची जागा आघाडीतील काँग्रेसकडे आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास संजय काकडे उत्सुक आहेत, पण अद्याप निश्चित काही कळालेले नाही. तसेच भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. संजय काकडे यांनी अनेकवेळा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काकडे हे कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार हे निश्चित नसताना आता संभाजी ब्रिगेडने त्यांना आपल्या पक्षाकडून लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

संतोष शिंदे म्हणाले, की सामान्य लोकांच्या, प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत आम्ही लढत आलो आहोत. आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यसत्येशिवाय पर्याय नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे व संसदेवर संभाजी ब्रिगेडचा 'भगवा' फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. संभाजी ब्रिगेडसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. परंतु, संभाजी ब्रिगेडच्या वतीने अजून 'अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.' आणि मी निवडणूक लढणार आहे. व भल्याभल्यांची झोप आम्ही उडवणार आहोत. काकडे यांच्यासाठी मी निवडणुकीतून एक पाऊल मागे घेऊन काकडे यांच्यासाठी पुणे लोकसभेची जागा सोडायला तयार आहे. काकडेंनी 'संभाजी ब्रिगेड' कडून उमेदवारी मिळण्यासाठी 'संभाजी ब्रिगेड'ची संपूर्ण निष्ठावंत ताकत त्यांच्या पाठीशी उभी करायला तयार आहे. माझी उमेदवारी 'मी' त्यांना द्यायला तयार आहे. काकडेंनी संभाजी ब्रिगेडचा विचार करून  लोकसभेची तयारी करावी व आपली फरफट थांबवावी एवढीच मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT