Shakti
Shakti 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : काँग्रेस पक्षाला ॲपची ‘शक्ती’

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी बदललेल्या प्रचारतंत्राचा काँग्रेसनेही स्वीकार केला असून सोशल मीडिया, ‘शक्ती’ ॲपवर भर देत संघटनात्मक ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बूथप्रमुखांच्या नियुक्‍त्या बहुतांश पूर्ण झाल्या असून, विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका, कोपरा सभाही सुरू झाल्या आहेत, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी लागू झाली, तरी काँग्रेसने निवडणुकीची तयारी सहा महिन्यांपासूनच सुरू केली होती. पक्षाकडून कोणताही उमेदवार निश्‍चित झाला, तरी लगेचच मैदानात उतरण्यासाठी पक्ष तयार आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मणिपूर आदी राज्यांत नुकत्याच विधानभेच्या निवडणुका झाल्या. त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी ‘शक्ती’ ॲप वापरण्यात आले. त्याचा वापर पुण्यातही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी ते डाऊनलोड केले आहे. त्या माध्यमातून कार्यकर्ते थेट प्रदेश किंवा राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी संवाद साधू शकतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच, काँग्रेस भवनमध्ये सोशल मीडियाची वॉररूम सुरू करण्यात आली आहे. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, इन्स्टाग्रामद्वारे कार्यकर्ते, नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. तसेच, बूथ कमिट्यांसाठी प्रमुख आणि सहायक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुमारे ९० टक्के पूर्ण झाली आहे. कोथरूड आणि पाषाणमधील नियुक्‍त्या लवकरच पूर्ण होतील. शहरात दहा ब्लॉक अध्यक्ष असून, प्रत्येक ब्लॉकमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सभा, बैठका सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसचा मतदार मोठ्या संख्येने झोपडपट्ट्यांत राहतो; त्याची दखल घेऊन त्यांचे प्रभागनिहाय मेळावे सुरू झाले आहेत. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यात येत आहे. महिला, युवक, कामगार, विद्यार्थी आदी सेलच्या बैठकाही कार्यान्वित झाल्या आहेत. प्रत्येक बैठक काँग्रेस भवनमध्ये घेण्याऐवजी त्या त्या ठिकाणी जाऊन विभागनिहाय बैठकांवर भर देण्यात आला आहे, अशी माहितीही बागवे यांनी दिली.

तयारी निवडणुकीची
सोशल मीडिया वापरण्याचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
‘शक्ती’ ॲपचा प्रत्येक वॉर्डापर्यंत प्रचार 
ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण 
विधानसभा, ब्लॉकनिहाय बैठका
हजारी बूwथ यंत्रणेमध्ये ९० टक्के कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या
मोदी सरकारचे अपयश मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी एलईडी स्क्रीनचे दोन रथ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT