Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

Sangli Loksabha election 2024 : सांगलीच्या जागेबाबत सोनिया गांधींनाच उत्सुकता; नाना पटोलेंनी सांगितला किस्सा

संतोष कानडे

Nana Patole News : सध्या राज्यात चर्चा आहे ती सांगलीच्या जागेची. ज्या जागेसाठी मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या उमेदवाराने कष्ट घेतले होते आणि ती सांगलीची जागा आपल्याला मिळावी, यासाठी काँग्रसेचे नेते ठाम होते; तिच जागा नाईलाजाने ठाकरे गटाला सोडावी लागली.

काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी काँग्रेसलाच तिकीट मिळावं, यासाठी दिल्लीवाऱ्या केल्या होत्या. परंतु ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे इच्छूक असलेले विशाल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

सांगलीच्या जागेसंदर्भात स्वतः सोनिया गांधींनी चौकशी केल्याचं नाना पटोले यांनी शुक्रवारी सांगितलं. ते एका जाहीर सभेमध्ये बोलत होते. पटोले म्हणाले की, मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा मॅडमने मला सांगलीच्या जागेबाबत विचारलं. त्यांना विशाल पाटलांचं नाव माहिती नसल्याने त्यांनी विश्वजीत कदम यांच्या तिकीटाचं काय झालं,असं विचारल्याचं नाना पटोलांनी सांगितलं. सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मॅडमने त्यावर तीव्र भावना व्यक्त केल्याचंही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम असूनदेखील उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर विशाल पाटलांनी पक्षावर दबाव आणत उमेदवारी मिळावी, यासाठी खलबतं केली. परंतु पक्षाकडून अधिकृतरित्या त्यांनी तिकीट मिळालं नाही. त्यामुळे विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते आपली उमेदवारी मागे घेतील, असं बोललं जात होतं. परंतु त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. उलट त्यांनी ही निवडणूक तिरंगी नसून दुरंगी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी एकप्रकारे चंद्रहार पाटलांना फारसं महत्त्व दिल्याचं दिसून येत नाही.

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले असून, त्यांनी मागणी केलेल्यांपैकी एकही चिन्ह त्यांना मिळू शकले नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर ही चिन्हं मागितली होती. परंतु त्यांना ही चिन्हं मिळाली नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Video: अंगाला भस्म अन् कुरळ्या केसांचा बाबा... ; राज ठाकरेंचे हावभाव चर्चेत, नाव न घेता कुणाला टोला?

लग्नसोहळा सुरू असतानाच अग्नितांडव, २२ जणांचा मृत्यू; इमारत जळून खाक, रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह, दुसरीकडे जखमी लोक

५५ वर ALL OUT; तरीही हा 'शहाणा' म्हणतो, पाकिस्तान बेस्ट टीम अन् आशिया चषक जिंकणार! नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर Video

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Teacher Award 2026: शाळेची पटसंख्या वाढवली, विद्यार्थ्यांना घडविले; संदीप शिंदेंचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव, शाळेचा केला कायापालट

SCROLL FOR NEXT