devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजप ४० पेक्षा जास्त जागा मिळवेल - देवेंद्र फडणवीस

'देशात सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वारे आहे. जनतेने आता मोदी यांनाच पुन्हा निवडून देण्याचे ठरविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'देशात सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वारे आहे. जनतेने आता मोदी यांनाच पुन्हा निवडून देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजप ४० पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळवेल' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व्हेतील अंदाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही माध्यमांनी लोकसभेच्या निवडणुकीबाबतचा सर्व्हे नुकताच जाहीर केला, त्यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत जादा जागा मिळत असल्याचे चित्र आहे, त्याविषयी फडणवीस यांना प्रश्‍न विचारण्यात आला. फडणवीस म्हणाले, 'कोणताही सर्व्हे आला तरी आम्ही, त्याचा बारकाईने अभ्यास करतो. परंतु, सध्याचे चित्र भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजप सर्वाधिक जागा मिळवेल.'

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर फडणवीस म्हणाले, 'कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटबाबत घाबरण्याचे कारण नाही. मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.आपण सुसज्जतेकडे लक्ष देत आहोत. नव्या व्हेरीयंटचा सामना करण्यासाठी आपली तयारी आहे. मात्र प्रादूर्भाव जास्त वाढणार नाही, अशी अपेक्षा आपण करूयात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT