ujjwal-nikam
ujjwal-nikam 
महाराष्ट्र

लोकसभा उमेदवारीबाबत ‘नो कॉमेंट्‌स’- ॲड. उज्ज्वल निकम

सकाळवृत्तसेवा

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सध्या तर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव लोकसभेसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना सहमती दर्शविण्यात आली. मात्र ॲड.निकम यांच्या सहमतीनंतरच त्यांची उमेदवारी निश्‍चित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी पक्षातर्फे राज्याचे माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी यांना ॲड. निकम यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा करण्याचे अधिकारही देण्यात आले. 

याबाबत ॲड. निकम यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीबाबत आपल्याला प्रसिद्धी माध्यमातूनच कळले. मी सद्या नगरमध्ये असल्याने त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नाही, त्याबाबत ‘नो कॉमेंट्‌स’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT