Ramdas Athawale Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, तसे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

'रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर ‘एनडीए’सोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात.'

सांगली : आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, तसे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षण द्यावे. तमिळनाडूमध्ये वेगवेगळी वर्गवारी करून ६९ टक्के आरक्षण दिले आहे. त्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी वर्गवारी करून आरक्षण देण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी येथे व्यक्त केले.

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लावू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सांगलीत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आम्ही पहिली भूमिका मांडली. मराठ्यांना आरक्षण म्हणजे सगळ्यांना आरक्षण असे नाही. ज्यांचे आठ लाखांच्या आत उत्पन्न आहे, अशांना आरक्षण द्यावे.

याबाबत आमचे मंत्रालय विचार करीत आहे. यासाठी एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. दोन किंवा तीन वर्गवारीमध्ये हे आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल, तरी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिले पाहिजे.

यावर मार्ग म्हणून तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण दिले, त्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. मनोज जरांगे-पाटील यांनी २० जानेवारीला मुंबईला येण्याची गरज नाही, आरक्षण निश्चित मिळेल; परंतु सरकारला काहीसा वेळ द्यावा. आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात सुरू असलेला वाद मिटला पाहिजे. दोघांनी एकमेकांवर टीका करून ताकद वाया घालवू नये, असे ते म्हणाले.

राज्यात मंत्रिपद हवे होते

मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले, मात्र अजितदादा येताच त्यांचा विस्तार झाला अन् आमचा रखडल्याची खंतही श्री. आठवले यांनी व्यक्त केली. राज्यात किमान एक मंत्रिपद मिळाले पाहिजे, याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ऐक्य करायचे असेल तर खालच्या पातळीवर एकत्र आले पाहिजे. गावागावांत एकत्र आहोत का? आपण एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहतो का? लोक जर एकत्र आले, तर आम्ही ऐक्य करण्यास तयार आहे. इंडिया आघाडीला यश मिळणार नाही, चार पक्षांचे बारा वाजतील, असेही ते म्हणाले.

‘वंचित’ बरखास्त करून सोबत यावे

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून सोबत यावे. पक्षाच्या अध्यक्षपदासह माझे मंत्रिपद देऊ. रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर ‘एनडीए’सोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी ‘आरपीआय’ला ताकद देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT