Shivsena-Bjp
Shivsena-Bjp 
महाराष्ट्र

शिवसेनेच्या दाव्यामुळे ‘युती’चा तिढा

कैलास शिंदे

जळगाव, पालघर, भिवंडी जागेचा पेच; ‘भाजप’ला बंडाची भीती
जळगाव - शिवसेना, भारतीय जनता पक्षाची ‘युती’ होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी भाजपचे खासदार असलेल्या जळगाव, पालघर, भिवंडी या मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केल्यामुळे ‘युती’चा तिढा कायम आहे.

विद्यमान खासदारांच्या जागा सोडल्यास भाजपलाही अंतर्गत बंडखोरी होण्याची भीती आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ फेब्रुवारीला भाजपचे खासदार असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोऱ्यात शिवसेनेच्या प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याने राजकीय क्षेत्रांचे त्याकडेही लक्ष आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडे २६ जागा होत्या, तर शिवसेनेकडे २२ जागा होत्या. मात्र, या वेळी शिवसेनेने जास्त जागांवर दावा केला आहे. या वेळी शिवसेनेने तीन जागा अधिक मागितल्या असून, त्यात जळगाव, पालघर व भिवंडी मतदारसंघाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या तीनही ठिकाणी ‘भाजप’चे खासदार आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपचे ए. टी. पाटील खासदार आहेत. ते दोन वेळा निवडून आलेले आहेत. सन १९८९ पासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. केवळ एका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. अशा स्थितीत या वेळी मात्र या मतदारसंघातून शिवसेनेने दावा केला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारीची तयारीही सुरू केली आहे. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ फेब्रुवारीला याच मतदारसंघातील पाचोरा येथून निवडणूक प्रचाराचा नारळ वाढविणार आहेत. भिवंडी मतदारसंघातही भाजपचे कपिल पाटील खासदार आहेत; तर पालघरमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती; तर भाजपने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. या लढतीत भाजपला यश मिळाले होते. मात्र, आता पुन्हा शिवसेनेने या जागेवर आपला दावा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT