BJP-Shivsena
BJP-Shivsena 
महाराष्ट्र

युती न झाल्यास मंत्री मैदानात

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ‘इलेक्‍टिव मेरिट’ असलेल्या वजनदार नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. युती न झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर कृपाल तुमाने आणि कुंपणावरच्या अन्य खासदारांच्या हातात कमळ देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.

लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्यास जेमतेम तीन आठवडे शिल्लक आहेत. निवडणूक जवळ आली तरी युतीबाबत काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. शिवसेनेच्या मनात नेमके काय आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने भाजपने स्वबळाची तयारी ठेवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर लढण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे लोकसभेच्या मैदानात जनतेला परिचित असलेले चेहरे देण्यावर भाजपचा भर आहे.

१६ ते १८ ठिकाणी नवे उमेदवार
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढावे लागल्यास विद्यमान खासदारांच्या जागा वगळता १६ ते १८ ठिकाणी नवे उमेदवार द्यावे लागतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग, रायगड, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना मुंबई दक्षिणमध्य आणि महादेव जानकर यांना बारामतीची जागा सोडून उर्वरित जागांवर प्रभावी उमेदवार देण्याचे भाजपने ठरवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT