mamata banarjee in mumbai Twitter
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रगीताचा अवमान, ममतांविरोधात मुंबई भाजपची तक्रार

सकाळ डिजिटल टीम

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) नेत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिल्या दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत संयुक्त पत्रकार परिषदसुद्धा घेतली. आता ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) नेत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भारताच्या राष्ट्रगिताचा अवमान केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगिताचा अवमान केला असून त्यांनी खुर्चीत बसूनच राष्ट्रगीत म्हटले. तसंच काही ओळींनतंर मधेच ते थांबवलं असंही या तक्रारीत म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या शिवेसेना नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे जाहीर करावं अशी मागणीही भाजपच्यावतीने करण्यात आली होती. शिवसेना आता महाराष्ट्रातले उद्योग पश्चिम बंगालला घालवून इथल्या लोकांना वडापाव विकायला लावणार का असा सवालसुद्धा भाजपने केला होता.

ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओसुद्धा महाराष्ट्र भाजपने शेअर केला आहे. त्यात भाजपने ट्विटरवर म्हटलं आहे की, आज शिवसेनेला राष्ट्रगीताचा अपमान करणारे अधिक प्रिय आणि जवळचे वाटू लागले आहेत ? मुंबईत येऊन राष्ट्रगीताचा अपमान करण्यात येतो आणि शिवसेनेचे नेते राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांच्या समोर झुकतात ही घटना मुंबईकर कधीही विसरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT